सावधान.. जास्त ड्रायफ्रूट्स खाताय ? जाणून घ्या तोटे

0

लोकारोग्य विशेष लेख 

ड्रायफ्रुट्स प्रत्येकाला आवडतात. ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. म्हणून यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही ड्रायफ्रुट्सचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर सावधान.. तुमच्या शरीरासाठी ते  हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया जास्त ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास होणारे तोटे..

वेगाने वजन वाढू शकते

जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकते. ड्रायफ्रूट्समध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

पोट फुगण्याची समस्या

मनुका सारख्या काही ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर फायबर असते. याचे जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने सूज येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. सुका मेवा हा गरम स्वभावाचा असतो, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

टाइप-2 मधुमेहाचा धोका

काही सुक्या फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्याचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.

पोषक तत्वांमध्ये असंतुलन

जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने तुमच्या शरीरातील काही पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते. ज्याप्रमाणे जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या पातळीत असंतुलन होऊ शकते, म्हणूनच हिवाळ्यात, मूठभर ड्रायफ्रूस्टचा समावेश करावा, ज्यात बदाम, काजू, मनुका, अक्रोड इत्यादींचा समावेश असावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.