तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पावसाळा आला की, सर्वत्र हिरवळ, आणि नयनरम्य निसर्गाचे दृश्य निर्माण होते. त्यामुळे पावसाळी सहलीचे वातावरण आपसूकच होते. त्यात बर्याच जणांना ट्रेकिंग चा मोह होतो तर काहींना धबधब्यात अंघोळीचा, प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे ठिकाण ठरवून आपला दिवस परिवार अथवा मित्रांसोबत घालवतात. काही अतिउत्साही आपल्या निशाकाळजी पणामुळे स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक अतिउत्साही तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
धक्कादायक घटना तामिळनाडूमधील कोडाईकनाल जिल्ह्यामधून समोर आलीय. धबधब्यावर फोटो काढण्याच्या नादात एक 28 वर्षीय तरूण तोल जाऊन धबधब्यात कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नको ते साहस करण्याच्या प्रयत्नात तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
संपूर्ण घटना तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे धबधब्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो अजूनही बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे.
फोटोच्या नादात धबधब्यात वाहून गेला तरूण, Video आला समोर pic.twitter.com/aB3txUhGYe
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 6, 2022