धक्कादायक; १७ वर्षीय युवतीची आत्महत्या…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भुसावळ तालुक्यातील टाहकळी येथील सतरा वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि ९ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील टाहकळी येथील युवती सानिका उर्फ चांदणी योगेश चौधरी १७ हि जळगाव येथे शिक्षण घेत होती. मात्र रक्षाबंधन सणानिमिताने गावी आली होती. दि ९ मंगळवार रोजी संध्याकाळच्या सुमारास आई वडील हे दोघेही स्वाध्यायाला गेले होते. चांदणी घरात एकटीच होती तीने घरातील बेडरूमच्या छताच्या असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मयत चांदणी हिच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सह.फैजदार नरसिंग चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.