डॉ. एस आर. रंगनाथन यांचा जयंतीदिन साजरा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

दि.१० ऑगस्ट २०२२ धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे स्वातंत्र्याची ७५ वर्ष महोत्सवांतर्गत ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या १३०व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रंथपाल किशोर भोळे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ग्रंथ प्रदर्शन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पोस्टर प्रदर्शन, विविध सामाजिक विषयांवर आधारित पेपर कात्रण, पर्यावरणासंबंधी इकोमॉडेल याचे प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरानी पहावे असे प्रतिपादन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांनीं तयार केलेले इको मॉडेल, पोस्टर प्रदर्शन, विविध सामाजिक विषयावरील पेपर कात्रणे हे वर्षभरातील विविध राष्ट्रीय, राज्य परिषदेमध्ये संशोधन पेपर काढण्यासाठी याचा उपयोग निश्चितच या संशोधक विद्यार्थ्यांनां होईल असे आवाहन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाप्रसंगी डॉ. यशवंत महाजन, डॉ. उमेश वाणी, डॉ. शाम सोनवणे, डॉ. भारती गायकवाड, डॉ. कल्पना भारंबे, डॉ. सुनिता चौधरी, डॉ. नितीन बडगुजर, डॉ. योगेश महाजन, डॉ. अशोक हनवते, डॉ. दिपक महाजन, डॉ. निलेश शांताराम चौधरी, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. भुषण राजपूत , प्रा. जुगल घुगे, कार्यालय अधीक्षक धनंजय महाजन, लेखापाल रवींद्र चौधरी क्लर्क अमोल पाटील,  बगीचा माळी राजकुमार पवार,  ग्रंथालय शिपाई श्री. विलास दुसाने आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि  विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल गायत्री असोदेकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.