धक्कादायक; बालदिनानिमित्त शाळेची सहल… स्कूल बस उलटून 2 ठार…

0

 

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये स्कूल बस उलटली. या अपघातात एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये ५१ मुले होती आणि शाळेचे सात कर्मचारीही उपस्थित होते. ही बस नेमकी कशामुळे उलटली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

1 शिक्षक आणि 1 विद्यार्थ्याचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर ट्विट केले असून, नयागाव भट्टे (सितारगंज) येथील वेदराम शाळेच्या किच्छा येथील बसच्या अपघाताची दुःखद बातमी मिळाली आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्याची अत्यंत क्लेशदायक माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना प्रशासनाने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे.

स्थानिक लोकांनी प्रथम मदत केली

या अपघातात अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्याची बातमी आहे, मात्र कोणतीही आकडेवारी जाहीर झालेली नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूलाही दुजोरा मिळाला आहे. सध्या फक्त जखमी विद्यार्थिनींना वाचवण्यावर भर दिला जात आहे. घटनास्थळावरून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुखापत गंभीर आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि स्थानिक लोक मदतीला धावून आले. त्यांनीच जखमी झालेल्या मुलांना बसमधून बाहेर काढले आणि नंतर रुग्णालयात नेले.

बालदिनानिमित्त विद्यार्थी सहलीला गेले होते

बालदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नानकमत्ता गुरुद्वाराला भेट देण्यासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सितारांगज येथे अचानक बस उलटली आणि मोठा अपघात झाला. बसमध्ये ५१ मुले होती आणि शाळेचे सात कर्मचारीही होते. घटनास्थळी डीएमसह पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्यात गुंतले.

Leave A Reply

Your email address will not be published.