अमळनेरात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व योगेश्वर माध्य.विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकिय तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी धनदाई संस्थेचे चेअरमन दत्तात्रय दयाराम पाटील, मुख्याध्यापक के डी पाटील, सानेगुरुजी पतसंस्थेचे सचिव तुषार पाटील, प्रा.ए के अग्रवाल, अमळनेर तालुका क्रीडाध्यक्ष एस पी वाघ, महेश माळी, प्रा.डॉ.शैलेश पाटील, आर एस सोनवणे उपस्थित होते. सुरुवातीला अगोदर छ.शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी बुध्दीबळ खेळातील चाल चालुन स्पर्धेचे उद्घाटन केले.

या स्पर्धेतील प्रथम पाच खेळाडू जिल्हा स्तरावर जळगाव येथे जाणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शैलेश पाटील, आभार एस आर जाधव यांनी केले. या स्पर्धा साठी के.आर बाविस्कर, आर घुगे, अतुल बोरसे, आर जी राठोड, प्रा.प्रितेश तुरणकर, स्वप्नील पाटील, हर्षदा सुर्यवंशी ,मोनिका चव्हाण, यज्ञेश जगताप, विनोद पाटील उपस्थित होते. या स्पर्धा घेण्यासाठी अमळनेर तालुका क्रीडा अधिकारी व कुस्ती कोच जगदिश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.