कला दिग्दर्शक भूषण वले यांची राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक पदी नियुक्ती…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महाराष्ट्र शासन आयोजित हौशी राज्यनाट्य स्पर्धेची उद्यापासून जळगाव केंद्र वगळता उर्वरित सर्वच केंद्रांवर तिसरी घंटा वाजणार आहे. जळगाव येथील नाट्यगृहाच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे, जळगाव केंद्रावर दि. २४ पासून राज्य नाट्यस्पर्धेला सुरवात होणार आहे. यंदाचे हे स्पर्धेचे ६१ वे वर्ष असून सर्वच स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे. जळगाव केंद्राला नवा आणि युवा समन्वयक भूषण वले यांच्या रूपाने मिळाला आहे.

भूषण वले हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवीधर आहेत. नाटक, चित्रपट मधे त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याच बरोबर ते उत्कृष्ट चित्रकार, डिजिटल ग्राफिक डिझायनर आहेत. सदर नियुक्ती बाबत ग्रामविकास व पंचायत राज तथा वैद्यकीय शिक्षण, युवक कल्याण मंत्री ना. गिरीष महाजन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.