शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षकाला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले

0

मालेगाव ;-महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.  मारेकऱ्यांनी एका शिक्षकाला रस्त्याच्या मधोमध मारहाण करून जिवंत जाळले आहे. एका शिक्षकाला जिवंत जाळल्याने जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने या दुर्घटनेत त्या शिक्षकांचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनुने हे सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मोटारसायकलवरून शाळेत जात होते. त्यावेळी वाटेत अज्ञात आरोपींनी त्यांची मोटारसायकल थांबवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या शिक्षकाला त्यानंतर जखमी अवस्थेत वाशिममधील रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र भाजून गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना पोलिसांना कळताच जऊलका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर जऊलका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला जिवंत जाळले गेल्याने जिल्ह्यासह राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी शिक्षकाला आडवाटेवरच जाळून पसार झाल्याने आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांना आहे. तरीही पोलिसांनी पथके निर्माण करुन तपास सुरु केला आहे.

प्राथमिक शिक्षकाला मारहाण करुन जिवंत जाळले गेल्याने अनेकांना धक्काही बसला आहे. शिक्षकाला मारहाण करुन का जाळण्यात आले त्याचा शोध पोलीस घेत असून कुटुंबीयांबरोबरही याबाबत चर्चा केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.