धनुष्यबाण वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगात धाव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत १-२ नाहीतर चक्क दहा खासदार अनुपस्थित होते. धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यामुळे शिवसेनेच्या चाळीस आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे आणि ईतर ४० आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह जाण्याची शक्यता असल्याने आता उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगात धाव घेऊन आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.