जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील सृजन कला अकादमी आणि नाट्यरंग थिएटर जळगाव निर्मित रंगकर्मी अमोल ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य ‘पुस्तक एके पुस्तक’ याचे सादरीकरण भाऊंचे उद्यान या ठिकाणी काल रविवार रोजी उत्साहात पार पडले. हे बालनाट्य विद्यार्थ्यांचे बालपण आणि पुस्तकी शिक्षण मार्मिक भाष्य करणारे होते.
पुस्तक एके पुस्तकचा हा ११ वा प्रयोग होता. प्रारंभी धनश्री जोशी यांनी बुरगुंडा या भारुडाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. नाट्य रसिकांसह बालकांनी या प्रयोगास उपस्थिती देवून मनसोक्त आनंद लुटला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.