पारोळ्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा येथे संभाजीराजे पाटील फाउंडेशनच्या वतीने शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा येथे संभाजीराजे पाटील फाउंडेशनच्या वतीने पारोळा येथील विजयानंद मंगल कार्यालयात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे,

याप्रसंगी नामदार अनिल पाटील यांनी सांगितले की, खरोखरच आज अश्या प्रदर्शनाची गरज आहे. या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे तसेच येणाऱ्या तरूण पिढीला हे प्रेरणादायी ठरेल. याप्रसंगी पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या तरुणांना हे प्रदर्शन म्हणजे स्पुर्ती देण्याचे कार्य आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाचारण करून त्यांना इतिहासाची जाण करून दिली पाहिजे. याप्रसंगी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ संभाजीराजे पाटील यांनी सांगितले की, आमच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळेला या प्रदर्शनाचे पत्र दिले आहे. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

या उद्घाटन समारंभावेळी मा. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोविंद शिरोळे, नगरसेवक पि.जी. पाटील, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, राहुल निकम,  डॉ. स्नेहल पाटील, अन्नपूर्णा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पारोळा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ महेश पवार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.