महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचा शुभारंभ….

0

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना आज अखेर पूर्ण विराम लागला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दादरमधील आंबेडकर भवन (Ambedkar Bhawan) येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवांपासून स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले विधान आणि ठाकरे गटाने दिलेला दुजोरा पाहता, हि युती होणार हे मात्र नक्की होते. अशातच आज २३ जानेवारी रोजी सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत या युतीबद्दल जवळपास खात्री वर्तवली आहे.

‘शिवशक्ती’ (ShivaShakti) आणि भीमशक्ती एल्गार (Bhimshakti Shakti), संयुक्त पत्रकार परिषद. २३ जानेवारी दुपारी १२.३० वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व अशा प्रकारचे ट्विट राऊत यांनी केले होते. त्यानंतर दादरच्या भवनात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघं पक्षाच्या प्रामुखांनी सडेतोड भाष्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.