मोठी बातमी; बिग बॉस फेम ‘शिव ठाकरे’ला ईडीची नोटीस !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बिग बॉस फेम आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरेला ईडीनं नोटीस पाठवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्यासह अब्दू रोझिकचं नाव देखील त्या यादीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपल्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिव ठाकरेला आगामी काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचे कारण त्याला पाठविण्यात आलेलं ईडीचं समन्स. शिव आणि अब्दू रोझिकला ईडीनं मनी लॉड्रिंग प्रकरणात समन्स पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत एबीपीनं वृत्त दिलं आहे.

हे प्रकरण सध्या जेलमध्ये असणाऱ्या ड्रग माफिया अली असगर शिराजीशी संबंधित आहे. त्यावरून अब्दू आणि शिवला नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांची चौकशी सुद्धा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये शिव आणि अब्दुची कोणतीही महत्वाची भूमिका नाही. त्यांना केवळ हायप्रोफाईल मनी लॉड्रिंग केस असल्यानं चौकशी आणि साक्षीसाठी बोलविण्यात आले होते. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.