महाराष्ट्रातील McDonald’s मध्ये बॅन झाले चीज, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

खवय्यांचे आवडते ठिकाण म्हणजे मॅकडोनॉल्ड, पण या मॅकडोनॉल्डने ग्राहकांना उल्लू बनवल्याचे समोर आले आहे. मॅकडोनॉल्ड रेस्टोरंटमध्ये चिजपासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल असते. खवय्ये चीज पदार्थांवर तुटून पडतात. पण मॅकडोनॉल्ड चीज न वापरतात, चीज सदृश्य पदार्थ वापरत असल्याचे उघड झाले आहे. अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. कंपनीला सर्वच पदार्थांच्या नावातून चीज हा शब्द काढण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. मॅकडोनॉल्डने चीज शब्द काढले असून पदार्थांची नवी नावे जाहीर केली आहेत.

कसा उघड झाला प्रकार
अहमदनगर येथील मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार उघड झाला होता. विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरल्या जात असल्याचे समोर आले होते. अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी प्रकरणात रेस्टॉरंटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरीही रेस्टॉरंट त्याला जुमानले नाही. नंतर राजेश बढे आणि डॉ.बी.डी. मोरे या अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला. तरीही प्रतिसाद न दिल्याने अखेर पदार्थ विक्री थांबविण्याचा इशारा देण्यात आला.

मॅकडोनॉल्डने केला बदल
कारवाईच्या धास्तीने मॅकडोनॉल्डनेआता चीज हा शब्द काढून टाकला. नवीन यादीत पदार्थांसोबत चीज हा शब्द नसेल. मॅकडोनॉल्डची साखळी रेस्टॉरंट चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रायव्हेट लिमिटेडने या पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र अधिकाऱ्यांना दिले आहे. हा बदल केवळ अहमदनगर पुरताच मर्यादित नसून कंपनीच्या राज्यातील सर्वच रेस्टॉरंटला लागू झाला आहे. या आदेशाची काटेकोर अंबलबजावणी करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांची फसणूक
पण आतापर्यंत या कंपनीने ग्राजकांची दिशाभूल केली. त्याविषयी कोण कारवाई करणारा हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकांना चीज पदार्थांच्या नावाखाली चीज सदृश पदार्थ खाऊ घालणाऱ्या मॅकडोनाल्डवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ग्राहकांना इतक्या दिवस चूना लावल्याबद्दल मॅकडोनाल्डने साधी दिलगिरी, माफी सुद्धा मागितली नाही, हे विशेष. त्यामुळे याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.