शिवसेनेचा आक्रोश की जल्लोष ? (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन बंड पुकारला होते. सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी व शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना परतण्याचे आवाहन केले होते. मात्र ते परतले नाही. भाजपने नवीन खेळी खेळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले. यामुळे बंडखोरांबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

तसेच आपण सर्व शिवसेना आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्यासाठी शिवसेनेकडून आक्रोश मोर्चाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. शहरातील चित्रा चौक येथून शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी भगवे झेंडे घेवून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.

https://fb.watch/d-T0oDhuZ5/

मात्र यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यासह कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात नाचत जल्लोष करतांना दिसले. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा जल्लोष नेमका कशासाठी.. हा शिवसेनेचा आक्रोश मोर्चा होता की जल्लोष मोर्चा ?..

Leave A Reply

Your email address will not be published.