विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवी रिंगणात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सत्तांतर झालंय. त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर  आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.