पोलीस प्रशासनाचा जनतेसाठी ‘जनता दरबार’ ! (व्हिडीओ)

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासह तक्रारींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारचे आयोजन पोलीस मल्टिपर्पज हॉल येथे  करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे अन्य अधिकारी व तक्रारदार नागरीक उपस्थित होते.

या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे ऑन द स्पॉट निराकरण केले. तसेच या पुढे जनता दरबाराचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी केले जाईल व अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील असे डॉ.प्रवीण मुंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.