मुसळधार पावसाचा इशारा; 11 राज्यांना अलर्ट

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशातील बहुतांश राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून जिथे अद्याप पाऊस पोहचलेला नाही तिथे आगामी काही दिवसांत पोहोचू शकतो. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. भोपाळमध्येही अडीच तासांत सव्वा तीन तास पाऊस झाला.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्यप्रदेश, राजस्थानसह राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगाल, सिक्‍कीम, आसाम, मेघालय, महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक, उत्तर केरळ येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब-हरियाणा येथे मध्यम आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होईल.

देशात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा 8 टक्के कमी पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार मध्य भारतात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.