श्री. क्षेत्र नागेश्वर परिसरात श्री. मोती माता यात्रेचे आयोजन

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सालाबादप्रमाणे पौष शुद्ध पौर्णिमा दि. ०६ जानेवारी २०२३ रोजी शिरपूर तालुक्यातील मौजे नागेश्वर शिवार अजनाड बंगला येथील मोती माता देवीच्या ४४ व्या प्रकट दिनानिमित्त नियोजित यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी मोती मातेचे दर्शन घेण्याचे आवाहन भूपेश भाई पटेल अध्यक्ष श्री. नागेश्वर सेवा संस्थान अजनाड बंगला, मोती मातेचे पुजारी परशुराम महाराज जाधव (बभळाज) तसेच पंचक्रोशीतील मोती माता यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

रितीरिवाजाप्रमाणे मोती माता भक्त संस्थापक (दिवंगत मंडाआई रा. बभळाज ता. शिरपूर. जी.धुळे.) यांच्या निवास स्थानावरून दि. २९ डिसेंबर २०२२ शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजेला बभळाज गावातील भाविक भक्त आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी सोबत मिरवणूक काढत मोती मातेच्या मंदिरात येऊन अखंड ९ दिवस चालणाऱ्या ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम विधिवत पूजन करून मोती माता पुजारी परशुराम महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

दि.६ जानेवारी शुक्रवार रोजी प.पू. भक्त मंडाआई यांचे कनिष्ठ सुपुत्र व मोती माता पुजारी परशुराम महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोती मातेचा ध्वज व गुणा महाराज यांच्या ध्वजाची मिरवणूक काढत श्री. क्षेत्र नागेश्वर परिसरातील मोती माता मंदिरावर ध्वज आणत, भूपेश भाई पटेल अध्यक्ष श्री. नागेश्वर सेवा संस्थान अजनाड बंगला यांच्या हस्ते ध्वज लावण्यात येणार आहे. व मोती मातेची विधिवत पूजा करून यात्रेला सुरवात होणार आहे.
तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मातेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कारण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.