शिरपूर येथे एकाच ठिकाणी फोडले ४ दुकाने

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

थाळनेर (ता. शिरपूर) येथील मुख्य बाजारपेठेतील ४ दुकाने एकाच रात्री फोडून चोरटयांनी रोकड लंपास केली. युवकाला जग आल्याने आणखी दुकाने फोडण्याचा प्लॅन उधळला जाऊन चोरटयांनी पलायन केले आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेरच्या बाजारपेठेत असलेले मातोश्री मेडिकल व जनरल स्टोअर्स फोडून चोरटयांनी गल्ल्यातील ८ हजार रुपये चोरले. या दुकानासमोर कैलाससिंह राजपुरोहित यांचे राजस्थानी जोधान स्वीट्स ॲन्ड नमकीन हे दुकान फोडून तेथील गल्ल्यात ठेवलेले ३३ हजार रुपये चोरटयांनी पळविले. याच परिसरातील कापड दुकान व भांड्यांचे दुकान चोरटयांनी फोडले. मात्र तेथील गल्ल्यात चिल्लर शिल्लक होती. ती घेऊन चोरटे जात असताना शेजारील घरात झोपलेल्या अमोल निळे याला जाग आली. त्याने पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. थाळनेर पोलीस ठाण्याची व्हॅन घटनास्थळी तातडीने पोहचली. त्यांना पाहून चिल्लर जागीच फेकून देत चोरटयांनी पळ काढला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद
मेडिकलचे मालक उमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक दीपक पावरा तपास करीत आहेत. थाळनेर येथे १८ फेब्रुवारीला मध्यरात्री बाजारपेठेतील मेडिकल, मिठाई, कपडे, व भांडे विक्रीची दुकाने कुलूप तोडून चोरटयांनी फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, परिसरात पथके रवाना करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.