शिर्डी येथे गुरुपौर्णीमा उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिर्डी, येथील साईबाबा मंदिरात श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर (भा.प्र.से.) व वैद्यकिय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.