शिंदे गटाकडून चिन्हासाठी पर्याय सादर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिंदे (Shinde) आणि ठाकरे (Thackeray) गटाच्या चिन्हाचा वाद शिगेला पोहचला आहे. आज शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज शिंदेगटाला (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह (Election symbol) आज निश्चित होण्याची शक्यता आहे.

3 पर्याय सादर

आज सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत होती. त्यामुळे शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) 3 चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आला आहे. ई-मेलवरून शिंदे गटाने 3 पर्याय सादर केल्याची माहिती आहे.

दोन मेल

शिंदेगटाकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलाय. शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तसेच निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.