हवामान विभागाचा अलर्ट, महाराष्ट्रासाठी 72 तास..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात परतीचा पाऊस बरसत आहे. मागील आठडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. त्यातच आता पुढील 72 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती पुणे हवामान विभागाचे (Pune Meteorological Department) प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

मराठवाडा, विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आज दिवसभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढील 72 तासात पावसाचा अंदाज आहे. मात्र, राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाणार असल्याचाही पुणे हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.