महिला शिक्षिकेने मुलीला ३० वेळा मारले ; व्हिडीओ व्हायरल ; शिक्षिकेला अटक (पहा व्हिडीओ )

0

सुरत ;- सूरतमधील एका शाळेतील महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका एका चार वर्षांच्या मुलीला 30 वेळा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.

यानंतर शाळेने कारवाई करत महिलेला निलंबित केलं. साधना निकेतन शाळेत ही घटना घडली. वर्गात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीला मारहाण झाल्याचं फुटेज कैद झालं आहे.

शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. जशोदाबेन खोखरिया असं आरोपी महिलेचं नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त विपुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 323 आणि बाल न्याय कायदा 2015 च्या संबंधित कलमांनुसार अटक करण्यात आली.

सोमवारी वर्ग सुरू असताना खोखरिया त्यांच्या मुलीच्या पाठीवर आणि मारताना दिसली. गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पंशेरिया यांनी मुलीशी झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करण्यास सांगितले. शाळेच्या प्रशासनाने काही वेळातच या शिक्षिकाला शाळेतून निलंबित केलं.

मुलीच्या पालकांनी सांगितले की, जेव्हा त्यांची मुलगी घरी आली तेव्हा तिच्या अंगावर अनेक खुणा होत्या, शाळेतील शिक्षिकेने तिला बेदम मारहाण केल्याचं तिने सांगितलं नाही. मात्र मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना वर्गातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगितलं. शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांसमोर मुलीला किती निर्दयीपणे मारहाण केली हे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.