मोठा दिलासा…सणांपूर्वी डाळी झाल्या स्वस्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 सणांपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महिन्याभरात डाळींच्या किमती चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात विविध डाळींच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. घटलेली मागणी, वाढलेली आयात आणि विविध सरकारी उपाययोजनांमुळे डाळी स्वस्त झाल्या आहेत.

डाळींच्या किमतीबाबत इंडियन पल्सेस अ‍ॅण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. गेल्या एका महिन्यात डाळींच्या किमती 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आफ्रिकेतून तुरीच्या डाळीची वाढलेली आयात, कॅनडातून मसूर डाळीची वाढलेली आवक, सरकारने साठा मर्यादेवर केलेले कडक धोरण, हरभर्‍याची मोठ्या प्रमाणात विक्री आणि चढ्या दराने घटलेली मागणी यामुळे डाळींच्या किमतीत घट झाली आहे.

इंडियन फार्मसी गॅज्युएट्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात तुरीच्या डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या डाळीच्या किमती एका महिन्यात चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्याची किंमत कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेडर्स आणि स्टोरेजची कमाल मर्यादा याच कारणाने तुरीच्या डाळीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

तुरीच्या डाळीबरोबरच गेल्या महिनाभरात मसूर आणि हरभर्‍याची डाळ देखील स्वस्त झाली आहे. हरभर्‍याच्या डाळीच्या दरात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय मसूर डाळ दोन टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली. सरकार नाफेडच्या माध्यमातून चणाडाळ स्वस्तात खरेदी करीत आहे. त्यामुळे हरभरा डाळीचे दरही आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मसूरबाबतीतही अशीच चिन्हे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.