दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप थांबायचे नाव घेत नाहीये. मात्र सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओने सगळीच हद्द पार केल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली मेट्रो प्रवासाच्या सोई सुविधांपेक्षा त्यामधील व्हायरल व्हिडिओमुळेच चर्चेत असते. कधी कपलच्या रोमान्समुळे, कधी प्रवाशांच्या फायटिंगमुळे तर कधी रिल्सस्टारच्या डान्समुळे. मेट्रो प्रशासनाने असे व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाईही केली होती. मात्र दिवसेंदिवस असे अश्लील प्रकारच वाढतच जात असल्याचे दिसून येत आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकऱ्यांनी असा किळसवाणी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा द्या.. अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल चक्क एकमेकांच्या तोंडात चुळ मारुन ड्रींक पितांना दिसत आहे. वाचूनच अगदी किळसवाणा वाटणारा हा प्रकार, पण दिल्ली मेट्रोत हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल हातात कोल्ड्रिंगची बॉटल घेवून रिल शूट करत आहेत.