लोकशाही न्यूज नेटवर्क
इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या बचावासाठी गेलेलं भारत सरकारचं विमान लवकरच मायदेशात परत येणार आहे. हे विमान कधी आणि किती वाजता उड्डाण करणार याचा तपशील समोर आला आहे.

18000 भारतीय अडकले
विविध कारणांसाठी इस्राइलमध्ये वास्तव्याला असलेले १८,००० भारतीय नागरिक सध्या तिकडे अडकले आहे. या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या हमास या अतेरिकी गटानं इस्रायलवर ड्रोन हल्ले केल्यानंतर इथं युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं नुकतीच ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा केली.
‘या’ दिवशी निघणार पहिलं विमान
या ऑपरेशन अजयनुसार पहिलं विमान इस्राइलमध्ये दाखल झालं आहे. जे भारतीय नागरिक इस्राइलमध्ये अडकून आहेत त्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं आहे. या भारतीयांना मायदेशात घेऊन येणारी विमानाची पहिली खेप आज संध्याकाळी इस्रायलची राजधानी तेल अविव इथून उड्डाण करणार आहे.


