शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जल्लोष

0

लोकप्रिय दुर्गा मंडळाच्या देखाव्याने वेधलं सगळ्यांचे लक्ष
शेंदुर्णी ता.जामनेर ;- ढोल ताशे बँण्ड पथक तसेच पारंपरिक वेशभुषा ,सजीव देखावे वाजंत्री च्या गजरात शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुक उत्साहात व शांततेत संपन्न झाली. लोकप्रिय दुर्गोत्सव मंडळाने सगळ्यांचेच लक्ष वेधुन घेतले होते.
यंदा संध्याकाळी मिरवणुकीस सुरुवात झाली होती. विविध दुर्गोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता.काही दुर्गोत्सव मंडळात युवती महिला पारंपारिक वेशभुषेत झांज व ढोल वादन करत होत्या तर काही ठिकाणी शिवकालीन युद्धकलेची विविध प्रात्यक्षिके सादर केली.यात तलवार, दांडपट्टा, लाठीकाठीची प्रात्यक्षिके यांचा समावेश होता.
लोकप्रिय दुर्गोत्सव मंडळाने यंदाही आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत सगळयांचेच लक्ष वेधुन घेतले होते.अग्रभागी अश्व,श्रीराम सीतख हे सजीव देखावा, झांजपथक ,ढोलपथक,एकच वेशभुषा व कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रुपातील सजीव देखावा डोळ्याचे पारणं फेडणारा होता.साक्षात जीवंत देखाव्याचे फोटो जागोजागी काढण्यात येत होते.सर्व राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते.
अतिशय शांततेत उत्साहात यंदिची दुर्गा विसर्जन मिरवणुक संपन्न झाली. यावेळी पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सान्प यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोउनि. दिलीप पाटील सहा.फौजदार शशिकांत पाटील, विरणारे,बडगुजर,पाटील पोलीस बांधव,होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.