अकलुद येथे आज यावल-रावेर तालुक्यातील कोळी समाज बांधव करणार रस्ता रोखो आंदोलन

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासून आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी समाज बांधव जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता मिळविणेसाठी १८ दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह आमरण उपोषण चालू आहे. याकडे शासन संबंधित उपोषण कर्त्याच्या मागणीकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. आदीवासी टोकरे, कोळी, ढोर, कोळीमल्हार, कोळी, महादेव कोळी, या जमातीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून, त्यांचे संविधानिक अधिकार मिळणे पासून वंचित ठेवत असलेल्या निषेधार्य रावेर व यावल तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधव २८ आँक्टोबंर रोजी सकाळी अकरा वाजता यावल तालुक्यातील अकलुद गावातील तापी पुलाजवळ तोटनाका जवळ रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे, निवेदन समाज बांधवानी फैजपुर पोलिस स्टेशनला दिले आहे.

यानिवेदनावर दिलीप कोळी, योगेश कोळी, अजय सपकाळे, नंदकीशोर सोनवणे, धनराज सपकाळे, बंडुभाऊ कोळी, विनोद झाल्टे, अनिल सपकाळे, संदिप सोनवणे, राहुल तायडे, विकास सपकाळे, नितीन सोनवणे सह समाज बांधवाच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.