मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोलीच्या चिमुकलीचे पत्राद्वारे आर्त हाक
हिंगोली ;- सर माझे बाबा देवाच्या घरी गेल्याचे माझी आजी मला सांगतेय. सर मला देवाच्या घरचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला घरी परत पाठवा”, आर्ट हाक देणारे पत्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या शेगाव खोडके येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या चिमुकल्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून हे पत्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी पिकाला योग्य भाव नसून कर्जाचा डोंगर. आदी कारणांमुळे आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली . इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी किरण खोडके हीने मुख्यमंत्री शिंदे यांना थेट पत्र पाठवून देवाचा नंबर देऊन माझया वडिलांना परत बोलवा अशी सद् घातली आहे.
या पत्रात मुख्यमंत्र्याना म्हटले आहे कि, म्हटलं आहे की, “तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी देखील चांगली जाईल. पण आमच्या घरी दसरा ही नाही अन् दिवाळीही नाही. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता, तर तुझा बाबा वारला नसता, असं आई सांगतेय. घरातून गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते बाबा देवा घरी गेलाय. सर देवाचं घर कुठे आहे त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला लवकरात लवकर पाठवा. लवकरच दिवाळी आहे आणि मी आणि माझा दादू वडिलांची रोज वाट पाहतोय पण ते येत नाहीत. आता आम्हाला रिसोडच्या बाजारात कोण कपडे घेऊन देणार”, असा सवाल देखील या पत्रामधून या चिमुकलीनं केला आहे.