इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षपदी डॉ. प्रशांत देशमुख यांची निवड

0

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क
शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या यशाबद्दल प्र. प्राचार्य डॉ. श्याम साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी त्यांचा सत्कार केला.संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिश काशिद, सहसचिव दिपक गरुड, संचालिका सौ उज्वलाताई काशिद, जेष्ठ संचालक सागरमल जैन, यु यु पाटील आणि सर्व कार्यकारी मंडळाने अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.