शूटिंग करताना संजय दत्त जखमी

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
दमदार अभिनयासाठी बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे. संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना संजय जखमी झाला आहे. शरीराच्या या भागांना दुखापत संजय दत्तबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार, तो बॉम्बस्फोटाच्या दृश्याचे शूटिंग करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता.

याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. या बातमीनंतर संजयचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.