शस्त्रक्रिया सप्ताह ठरतोय रुग्णांसाठी आरोग्याची पर्वणी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतील व्याधीमुक्‍त समाज हे ब्रिदवाक्य ८ ते १४ मार्च दरम्यान सुरु असलेल्या शस्त्रक्रिया सप्ताहाद्वारे पूर्ण होतांना दिसत आहे. अपेंडीक्स, हर्निया, व्हेरीकोज व्हेन्स, एन्जीओग्राफी, मणका विकार असो वा कॅन्सरवरील जोखमीच्या शस्त्रक्रिया सप्ताहात संपूर्ण मोफत होत असल्याने गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रिया सप्ताह हा आरोग्याची पर्वणी ठरत आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली आजाराचे निदान करणारी यंत्रणा, रक्‍त-लघवी तपासणीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळा, तज्ञांद्वारे तपासणी, गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग, स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्‍ला, मेडिसीन, भोजन ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहे. केसपेपरपासून ते डिस्चार्जपर्यंत सर्वच येथे मोफत होत आहे, याचा मागील ४ दिवसात हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे तर २८६ रुग्णांवर शल्यचिकित्सकांद्वारे शस्त्रक्रिया झाल्या आहेत. केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर बुलढाणा, अकोला, खामगाव, बर्‍हाणपूर, खंडवा येथून मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शिबिराचे केवळ तीनच दिवस शिल्‍लक आहे. कुठल्याही दुर्धर-गुंतागुंतीच्या आजारांवर अनुभवी शल्यचिकित्सकांद्वारे उपचाराच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२३६६७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वेळीच उपचार देई निरोगी आरोग्याचा मंत्र
वैद्यकीय सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये याकरीता सर्वसमावशेक शस्त्रक्रिया सप्ताह राबविला जात आहे. यात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अनुभवी तज्ञांद्वारे यशस्वी केल्या जात आहे. कुठल्याही आजारावर वेळीच उपचार घेतले तर मोठ्ठाले आजार आणि उपचार हे सर्व टाळता येते. निरोगी आरोग्यासाठी आजच सप्ताहात सहभागी होवून आरोग्याचे मंत्र जाणून घ्या.
– डॉ.केतकी पाटील, संचालिका, गोदावरी फाऊंडेशन

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.