ऑस्करमध्ये रेड नाही तर शॅम्पेन रंगाचे राहणार कार्पेट

0

लॉस एंजेलिस , लोकशाही न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे रविवारी 95वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठ्या अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध चेहरे आपल्या खास अंदाज आणि फॅशन सेन्ससह येतात. पण, यावेळी विशेष गोष्ट अशी आहे की 2023 ऑस्कर अवॉर्ड्समधील रेड कार्पेट ‘रेड’ नसून शॅम्पेन कलरचे असेल.

रेड कार्पेटवरच सेलिब्रिटी फोटोशूट, क्विक प्रश्न-उत्तरे आणि चाहत्यांचे मोमेंट्स कैद केले जातात. वास्तविक, रेड कार्पेट हे ऑस्कर पुरस्कारांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथे नवीन फॅशन ट्रेंड सेट होतात आणि बदलतात.

 

ऑस्करचे सूत्रसंचालन करणारे अमेरिकन कॉमेडियन-निर्माते जिमी किमेल यांनी जेव्हा हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये कार्पेट अनफोल्ड केले तेव्हा ते रेड नव्हते, तर शॅम्पेन होते. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सचे सीईओ बिल क्रेमर आणि अकादमीचे अध्यक्ष जेनेट यांग या वर्षीच्या कार्पेट अनफोल्डवेळी उपस्थित होते.होस्ट जिमी किमेलने गंमतीने मीडियाला सांगितले की, विल स्मिथने ख्रिस रॉकला गेल्या वर्षी स्टेजवर चापट मारल्याच्या प्रतिसादात हा बदल करण्यात आला आहे. जिमी किमेल म्हणाला – हा रंग या वर्षाचा आत्मविश्वास आहे. लाल रंगाऐवजी शॅम्पेन रंग असल्याने यावेळी शोमध्ये हिंसा होणार नाही हे निश्चित. या वर्षी कुणालाही इजा होणार नाही. तथापि, मी या वर्षी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे कळले तेव्हापासून मी मार्शल आर्ट्सचा सराव करत आहे.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.