चाळीसगावात भव्य शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

0

चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दि 9 मार्च रोजी संपन्न झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात 84 गरजू रुग्णांनी लाभ घेतला , फक्त 1 रुपयात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आलेल्या या शिबिरात 32 शस्त्रक्रियेचे रुग्ण फिटनेस नंतर अत्यल्प दरात शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले . ज्यामध्ये शरीरावरील चरबीच्या गाठी , हर्निया , हायड्रोसिल , फायमोसिस , तसेच मूत्रमार्गाचे दुर्बिणीद्वारे तपासणी , मुतखडा इ. विविध आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स Dr प्रशांत खैरनार , Dr उमेश जाधव तसेच Dr सुधन्वा कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी रोटे बलदेव पुन्शी , रोटे संजय चौधरी , रोटे बाळासाहेब सोनावणे तसेच बापजी हॉस्पिटल येथील कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराच्या माध्यमातून खरोखर गरजू व पीडित रुग्णास सेवा देताना अत्यंत आनंद होत आहे असे मनोगत बापजी हॉस्पिटल चे संचालक रोटे Dr संदीप देशमुख यांनी उदघाटन व मूत्रविकार विभागाचे लोकार्पण करताना व्यक्त केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.