शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर (पहा व्हिडीओ )

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

शरद पवार यांचा राजीनामा समितीने एकमताने नामंजूर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच पवार यांनीच अध्यक्षपदी रहावे अशी विनंती करणार असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यर्त्यांनी जल्लोष केला.सिल्व्हर ओक मध्ये झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, यांच्याह नेते पदाधिकारी उपस्थित होते.

“प्रस्ताव- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम रहावे अशी विनंती करण्यात येत आहे”

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर गोंधळाचे आणि असंतोषाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असे कालच शरद पवारांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर समितीची आज बैठक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे शरद पवारांचा राजीनामा फेटाळला गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.