‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ विषयावर कार्यशाळा उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर आयोजीत कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत २०० विद्यार्थ्यांनी सहभागी होत इन्फेक्शन आणि त्यावरील उपायासंबंधीची माहिती जाणून घेतली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी आणि फार्मोकोलॉजी विभागातर्फे एकात्मिक अध्यापन कार्यक्रमांतर्गत ‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, मेडीसीन तज्ञ डॉ. चंद्रय्या कांते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी डॉ.कैलास वाघ, डॉ. प्रशांत गुडेट्टी, डॉ. गुरूदत्त मोहिर हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरूवातीला डॉ. रश्मी बनकर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यशाळेत यांनी केले सादरीकरण
मायक्रोबायोलॉजी आणि फार्मोकोलॉजी विभागातर्फे एकात्मिक अध्यापन कार्यक्रमांतर्गत ‘प्रतिजैविकतेचे आरोग्यातील महत्व’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत मधुरा कोल्हे, चाहुल मानकर, रूतिका झाडबुके, श्रृती तडस, खुशी सुराणा, वाजिहा यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. कार्यशाळेला २०० विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.