महापौरांनी केले शरद पवार यांचे स्वागत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खा. शरद पवार, राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जळगावात आगमन झाले.

जळगाव शहरातर्फे महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, रोहिणीताई खडसे खेवलकर, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस रविंद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार मनीष जैन आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.