चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी आराम बस उलटली; २५ जण जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खेड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी आराम बस उलटली. गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळबणी गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खासगी आराम बस रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे २५ जण जखमी झाले आहेत.

मुंबई परळ येथून केळणे गोमलेवाडी येथे आज (शुक्रवार) सकाळी खासगी आरामबस (एमएच०४जीपी२३१९) मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळबणी गावानजीक सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला उलटली. या आराम बस मधून प्रवास करणारे २५ जण जखमी झाल्याचे समजते. चालकाला डुलकी लागल्याने बसवरील त्याचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाहेर जाऊन उलटली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघातातील जखमीना कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पोलीस व घटनास्थळी पोहोचलेल्या मदत ग्रुपच्या स्वयंसेवकांनी दाखल केले आहे.

रामचंद्र गोमले (३१), अल्पेश अरुण गोमले (३४), संदिप तुकाराम गोमले, अनंत सिताराम खेराडे, राजाराम धोंडू गोमले, रविंद्र धोंडू साळुंखे, वैजयंती लक्ष्मण गोमले, विठ्ठल घोंडु बोले, लक्ष्मण महादेव गोमले, ओंकार भगवान गोमले, काजल विजय फुटाणे, मनोहर सदाशिव गोमले, भावेश बाबु गोमले, अस्मिला सोनु गोमले, बाठकृष्ण तुकाराम गोमले, जितेश मधुकर गोमले, दशरथ राजाराम गोमेले, अल्पेश विजय गोमले, दिनेश विजय गोमले, महेंद्र दत्ताराम गोमले, अस्मिता अंकुश गोमले, सदानंद बाबु गोमले हे सर्व रा.केळणे.

Leave A Reply

Your email address will not be published.