शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद, जितेंद्र आव्हाड यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

एक राजीनामा आणि सर्व राजकारणावर त्याचे पडसात उमटत असल्याचे दसून येत आहे. सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत. शरद पवार यांनी आपली भूमिका बदलावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही देखील आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. जिल्हा पातळीवर देखील अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील सर्वच पदाधिकारी यांनी राजीनामे आज दिले आहेत.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.