सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता, आजच होऊ शकते घोषणा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

शरद पवारांच्या अचानक पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खूप मोठ्ठा धक्का अनेकांना बसला, शरद पवारांनी (Sharad Pawar) निर्णय मागे घ्यावा अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. काही ठिकाणी कार्यकर्ते उपोषणाला बसले तर काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव २-३ दिवस विचार करू असं शरद पवारांनी सांगितले. मात्र आता राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा कालपासूनच सुरु झाली होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), प्रुफल्ल पटेल (Prufall Patel) ही चार प्रमुख नावं चर्चेत होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने. अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. शरद पवार यांनी राजीनामा देण्याआधी काही दिवसांपासूनच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या कागदोपत्री हालचाली सुरु झाल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर या हालचाली सुरु झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची तयारी १५ दिवसांपासूनच सुरु झाली होती.

अजित पवार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. अजित पवार हे केंद्रात नेतृत्व करण्यास इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे. त्यात राज्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व आहे, तर सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.