विराट-गंभीरला घरी पाठवा, सुनील गावस्करांना राग अनावर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सोमवारचा सामना हा अजूनपर्यंत तरी कोणी विसरू शकले नाही आहे. सर्वच दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाने चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदल घेत जोरदार विजय मिळवला होता. त्यातच आता विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या भांडणावर लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी परखड भाष्य केलं आहे. सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीरबद्दल आपला राग व्यक्त केला. या प्रकरणात बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरला कठोर शिक्षा दिली पाहिजे, असं सुनील गावस्कर म्हणाले.

काय म्हणाले सुनील गावस्कर
याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, ‘मी या वादाचे व्हिडिओ पाहिले. मी हा सामना लाईव्ह पाहिला नव्हता. अशा गोष्टी क्रिकेटसाठी मुळीच चांगल्या नाहीत. 100 टक्के मॅच फी चा दंड काय असतो? 100 टक्के मॅच फी किती असते? सेमीफायनल आणि फायनल पकडून विराट कोहलीला 16 मॅचसाठी 17 कोटी रुपये मिळतात. याचा अर्थ प्रत्येक मॅचसाठी 1 कोटी रुपये होतात. ही भरपूरच कमी रक्कम आहे. गौतम गंभीरची काय स्थिती आहे? मला माहित नाही” असं सुनील गावस्कर म्हणाले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.