अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगरमध्ये वीज पुरवठा खंडित

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यात शेती शिवाराचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चांगदेव येथे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन मोठमोठे झाडे उन्मळून पडले आहे. हे झाडे घरांवर पडल्यामुळे घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, शंभर च्या आसपास घरांवरील पत्रे उडाल्यामुळे संसार उघडयावर पडले आहेत. झाडे विद्युत तारांवर पडल्यामुळे तार तुटून पडले आहेत तर विद्युत पोल वाकले आहेत त्यामुळे येत्या तीन चार दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता नाही.

चांगदेव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी एकनाथराव खडसे (Rohini Eknathrao Khadse) यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यांनी मुक्ताईनगर तहसीलदार आणि प्रशासनाशी नुकसानीचे सरसकट करण्याबाबत आणि विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्या बाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या सोबत माजी प.स सभापती विलास धायडे, जि. प सदस्य निलेश पाटील, अतुल पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, कैलास कोळी, दिपक ठाकरे, गोकुळ तायडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते झाडे पडल्यामुळे तार तुटून पडले आहेत तर विद्युत पोल वाकले आहेत. त्यामुळे येत्या तीन चार दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.