Thursday, May 26, 2022

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी: पत्रकाराला अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

मुंबई :शरद पवारांच्या सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात पत्रकाराला अटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणात गावदेवी पोलिसांनी पुण्यातील पत्रकाराला अटक केली आहे. चंद्रकांत सूर्यवशी असे या पत्रकाराचे नाव असून याप्रकरणात अटक आरोपींची संख्या ११५ झाली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानात शुक्रवारी दुपारी एसटी कर्मचार्‍यांनी घुसून दगड आणि चपला फेक करत हल्ला चढवला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करुन गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण ११० आरोपींना अटक केली होती. यात २३ महिलांसह सिल्व्हर ओक निवास्थानाची रेकी करणार्‍या चौघांचा समावेश होता.

गावदेवी पोलिसांनी सोमवारी गिरगाव न्यायालयाबाहेरून फेसबूक लाईव्ह करणार्‍या सचिदानंद पुरी याला अटक केली. तर, मंगळवारी वकील सदावर्ते यांचा चालक राम कातकडे याच्यासह संकेत नेहरकर आणि रमेश गोरे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी पत्रकार सूर्यवंशी याला पुण्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

गावदेवी पोलिसांना न्यायालयीन कोठडीत असलेल्या अभिषेक पाटील, कृष्णात कोरे, मोहम्मद ताजुद्दीन मोहम्मद मुनीरूद्दीन शेख आणि सविता पवार यांना ताब्यात घेतले आहे. या चौघांसह याप्रकरणात नव्याने अटक केलेल्या आरोपींना पोलिस आता गिरगाव येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करणार आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या