खुशखबर ! राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

विधिमंडळात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण विधेयक 2021) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एकमताने संमत केले होते. जानेवारी 2022 ला राजपालांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाले असून, याद्वारे राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती करताना, 9 जुलै 2019 रोजी केंद्र सरकारने लागू केलेल्या Reservation in Teacher’s Cadre Act, 2019 कायद्याची अंमलबजावणी होणार आहे.

त्यानुसार, विद्यापीठ व महाविद्यालयास एकक मानून संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने 11 एप्रिल 2022 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

केंद्र सरकारने Reservation in Teacher’s Cadre Act, 2019 समंत केल्यानंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) वेळोवेळी पत्र काढून देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये यामधील प्राध्यापक भरती प्रक्रियेत Professor recruitment process आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी याबाबतचे आदेश दिले होते. परंतु महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने आरक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जात नव्हती.

यासाठी National Federation of OBCs व विविध ओबीसी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात बैठका लावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात ओबीसी, भटके विमुक्त उमेदवारांसाठी आज महत्वाचा दिवस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.