शरद पवारांच्या आरोपांना उत्तर देत ‘छगन भुजबळ’ यांनी केले ‘हे’ गौप्यस्फोट

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं. सोबतच मोठे गौप्यस्फोट सुद्धा केले. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) राजीनामा देणार होते, पण त्यांना आपण रोखल्याचे भुजबळांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमकं काय घडले त्याबद्दल भुजबळ यांनी मोठे खुलासे केले आहे.

शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती. तेव्हा त्यांना मी मनवलं. पण तेव्हा त्यांनी ऐकले नाही. पण पुढे काहीच दिवसात त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं भुजबळ म्हणाले. पुढे ते म्हणाले, जेव्हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. तेव्हा आम्हा सगळ्या नेत्यांना तो निर्णय कलाविनायत आला. तेव्हा प्रफुल्ल पटेल नाराज झाले. ते म्हणाले मी राजीनामा देतो. दुसऱ्या क्रमांकाच्या पदावरून तिसऱ्या क्रमांकाचं पद मी घेणार नाही. असं म्हणाले असता मी त्यांना समजावलं तुम्ही आणि सुप्रिया दोघे कार्याध्यक्ष व्हा.

Leave A Reply

Your email address will not be published.