शरद पवारांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”
आज सायंकाळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका जाहीर केली. याप्रसंगी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आदींसह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.