KL राहुल IPL आणि WTC फायनलमधून बाहेर… कृणाल पंड्या कर्णधार…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल (KL राहुल) दुखापतीमुळे IPL आणि WTC फायनलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना आयपीएलनंतर होणार आहे. केएलच्या बाहेर पडल्यामुळे त्याच्या चाहत्यांना निश्चितच धक्का बसला आहे. राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आता शस्त्रक्रियेसाठी जाणार असल्याचे सांगितले. त्याच्या अनुपस्थितीत कृणाल पंड्या आयपीएलमध्ये लखनौ फ्रँचायझीचे नेतृत्व करणार आहे.

इंस्टाग्राम पोस्ट शेअर करताना केएल राहुलने लिहिले की, ‘वैद्यकीय टीमशी काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि सल्लामसलत केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, माझ्या मांडीवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.. येत्या काही आठवड्यांत माझे लक्ष स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर असेल. हा एक कठीण निर्णय आहे, परंतु मला माहित आहे की पूर्ण पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी हा योग्य निर्णय आहे.’

केएल राहुलने लखनौ संघाच्या कर्णधारपदाबद्दलही सांगितले आणि म्हणाला, ‘संघाचा कर्णधार म्हणून मी या महत्त्वपूर्ण वेळी संघासोबत नसल्यामुळे निराश झालो आहे. पण, मला खात्री आहे की मुले चांगली कामगिरी करून विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यासोबत प्रत्येक सामना पाहून मी तुम्हाला प्रोत्साहन देईन.

WTC फायनलमध्ये न खेळल्याबद्दल निराशा व्यक्त केली

केएल राहुलने पुढे पुष्टी केली की तो WTC फायनलचा भाग असणार नाही. त्याने लिहिले, ‘पुढच्या महिन्यात टीम इंडियासोबत ओव्हलमध्ये नसल्यामुळे मी पूर्णपणे निराश आहे. मी माझ्या तंदुरुस्तीवर काम करेन आणि पुन्हा माझ्या देशासाठी क्रिकेट खेळणार आहे.

केएल राहुलला संघातून वगळण्यात आल्याने लखनऊच्या चाहत्यांना निश्चितच मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आता राहुलऐवजी BCCI कोणत्या खेळाडूला WTC फायनलमध्ये स्थान देते हे पाहावे लागेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून रोजी ओव्हल येथे होणार आहे.

IPL मध्ये कर्णधारपद भूषवणारे पहिली भावांची जोडी…

याआधी हार्दिक पंड्या हा गुजरात संघाचे नेतृत्व करतांना आपल्याला दिसत आहे. त्याने मागच्या वर्षी संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. त्याच प्रमाणे आता कृणाल पंड्यालाही आता राहुल च्या बाहेर जाण्याने आपल्यातील नेतृत्वकौशल्य दाखवण्याची नामी संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे IPL मध्ये प्रथमच दोन बंधू संघाचे नेतृत्व करतांना दिसून येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.