गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्यांचे नाव आले समोर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. पुण्यात भरदुपारी शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. कुख्यात गुंड मोहोळची हत्या करणाऱ्या एका आरोपीचं नाव समोर आलं आहे. पुण्यातील गुंड शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या आहे. शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्याला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शरद मोहोळचा उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शरद मोहोळवर ३ ते ४ जणांकडून गोळीबार
शरद मोहोळवर दुपारी १.३० च्या सुमारास कोथरूडमधील सुतारदार येथे तीन ते चार जणांनी गोळीबार केला. शरद मोहोळवर याच्यावर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचे नाव समोर आलं आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे

Leave A Reply

Your email address will not be published.