मुंबईतील संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आताची मोठी बातमी असून  मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय इत्यादींसह अनेक प्रमुख संग्रहालयांना अज्ञात स्त्रोतांकडून बॉम्बस्फोटाचा इशारा देणारे धमकीचे ई-मेल प्राप्त झल्याची माहिती मिळत आहे.

ई-मेलवरून धमकी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ई-मेल अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सकाळपासून अनेक संग्रहालयांमध्ये केले होते. पहिला ईमेल CSMVS कडून कुलाबा येथे प्राप्त झाला आणि यानंतर इतरांनाही प्राप्त झाला.  संग्रहालयांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकासह संग्रहालयाभोवतीच्या परिसरात तपास सुरू केला. मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळून आले नाही. पोलिसांनी ईमेल प्राप्त झालेल्या सर्व संग्रहालयांची तपासणी केली. शुक्रवारी रात्री कुलाबा पोलिसांनी बॉम्बस्फोटांबद्दल फसव्या ई-मेल पाठवल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

तसेच  पाच दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला, पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. ज्याने शहरात बॉम्बस्फोटाचा इशारा दिला होता. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करणाऱ्या कॉलरने सांगितले की, नवीन वर्षात शहरात बॉम्बस्फोट होणार आहे आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.